जर्मन भाषा का शिकायची? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असणार! जर्मन भाषेबद्दल बोलण्यापूर्वी आजच्या ई -क्रांतीबद्दल थोडे बोलूया. या ई -क्रांतीचा आपणही एक भाग बनलो आहोत, होय ना ? त्यामुळेच आजच्या डिजिटल युगात आपण अपग्रेड होत राहणं महत्त्वाचं आहे. कोविड काळानं या डिजिटल क्रांतीचा पाया मजबूत केला असेही म्हणायला हरकत नाही. एखादा खजिना प्राप्त व्हावा तशी घरबसल्या लहान मोठ्यांना शिक्षणाची, नोकरीची आणि करिअरची देशागणिक आणि अगदी जागतिक द्वारं सुद्धा खुली झाली. या सुसंधी हेरण्यासाठी भाषा साहजिकच एक महत्वाचा घटक असल्याने जर्मन भाषा शिकणे नक्कीच उपयोगाचे आहे.
आता जर्मन भाषेबद्दल सांगायचं झालं ,तर जगातील १०० दशलक्ष लोकांची जर्मन ही मातृभाषा असून जगातील चौथ्या क्रमांकाची ही लोकप्रिय भाषा आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, बेल्जियम , लिखटेंस्टीन, लुक्झेम्बर्ग या देशांची जर्मन हि अधिकृत भाषा आहे. या भाषेच्या ज्ञानामुळे भारतात तसेच परदेशात अनेक जर्मन मल्टिनॅशल कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी भारतीयांना मिळत आहे. आयटी, ऑटोमोबाईल ,फार्मसी, ट्रॅव्हल- टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी, फॅशन , शैक्षणिक संस्था, रिसर्च, इंजिनीरिंग, मेडिकल, कला आणि साहित्य अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आणि करिअर करण्यासाठी जर्मन भाषेचे उत्तम ज्ञान ही उजवी बाजू ठरतेय. या क्षेत्रांशी संबंधित अनेक प्रोफेशनल्स जर्मन भाषेचा अभ्यास करून ‘वर्क फ्रॉम होम ‘ द्वारे थेट परेदशांतल्या नोकऱ्या स्वीकारून स्वतःच्या करीअरला एका वेगळ्याच उंचीवर आज घेऊन जात आहेत. म्हणूनच लहान वयातच मुलांना जर्मन भाषा शिकवल्यास त्याचे निश्चितच अनेक फायदे मिळतात.
जर्मन भाषेच्या शिक्षणाचाच एक भाग म्हणून मी या वेबसाईटवर लहान-मोठ्या सगळ्यांसाठी जर्मन भाषेची सहजसोपी ओळख करून देणार आहे. ती नक्की बघा, वाचा आणि जरूर शिका , तेही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमधून.
तर मग तयार व्हा, जर्मन भाषेच्या सहज सोप्या शिक्षणासाठी!
–सायली मराठे उर्फ क्लुगरकॉफ 😉
© 2023 Fungerman.in
Image credit- Freepik.com
(https://www.howtopronounce.com- pronunciation dictionary of German words)


Leave a Reply