ऑनलाइन जर्मन! जर्मन भाषेत हाय..हॅलो..सॉरी..थँक्यू!

 या पोस्टमध्ये आपण जर्मन भाषेमध्ये एकमेकांना अभिवादन कसे करायचे हे जाणून घेऊया. गुड मॉर्निंग, सॉरी किंवा थँक्यू ह्या आपल्या रोजच्या वापरातल्या शब्दांना जर्मन भाषेमध्ये काय म्हणतात माहित आहे? तर गुड मॉर्निंग साठी ‘गुटन मॉर्गन’ तर थँक्यू साठी ‘डांक’ हे जर्मन शब्द बोलले जातात. अशी आपल्या रोजच्या वापरातली मराठी अभिवादने किंवा इंग्लिश ग्रीटिंग्स हि जर्मन भाषेमध्ये पुढीलप्रमाणे प्रचलित आहेत-

गुटन मॉर्गन (Guten Morgen)- Good Morning
गुटन आबेंडस् (Guten Abends)- Good Evening
गुट नाख्ट (Gute Nacht)- Good Night
गुटन टाग (Guten Tag)- Good Day
हालो (Hallo)- Hello
बिट्ट बिट्ट (Bitte bitte) – Welcome
च्युस (Tschüss)- Bye
डांक (Danke)- Thank you ( informal)
बिट्ट (Bitte)- Please
एंटशुलडिगुंग (Entschuldigung)– Excuse Me!, Sorry
एस टुट मीअर लाइड (Es tut mir Leid)- Sorry
वी गेट्स (Wie geht’s?)- How are You?
मिअर गेहट एस गुट  (Mir geht es gut!)– I am good/fine/ok.
जेअर गुट (Sehr Gut)- Very Good                           
आलेस गुट झूम गेबुरस्टाग (Alles gute zum Geburstag )– Happy Birthday
ग्रॅच्युलीअरुंग (Gratulierung)-Congratulations
आलेस गुट– (Alles gut)- All the best!

(क्लिक करण्यायोग्य शब्दांना पिवळा फॉन्ट रंग आहे. हे शब्द कसे उच्चारायचे हे जाणून घेण्यासाठी, त्यांवर क्लिक करा. नंतर ‘www.howtopronounce.com’ वर ‘Back’ बटन दाबून ‘www.Fungerman.com’ पृष्ठावर परत या.) 

 

इंग्लिश भाषेप्रमाणे जर्मन भाषेमध्ये मात्र लहान मोठ्यांसाठी एकच ‘You’ संबोधन वापरले जात नाही तर आपल्या मराठी प्रमाणे ‘आपण, तुम्ही’ अशी आज्ञाधारक संबोधनं वापरली जातात. मराठी मध्ये जसं आपण आपल्या मित्र मैत्रिणींशी अरे -तुरे आणि मोठ्यांशी अहो-जाहो अशी संबोधनं वापरतो तशीच जर्मन भाषेमध्येही समवयस्कांशी बोलतांना वेगळी आणि मोठ्यांशी बोलतांना वेगळी संबोधनं वापरली जातात.

अशी ही वेगवेगळी संबोधन पुढच्या पोस्टमध्ये जाणून घेऊया.

 

Home

© 2023 Fungerman.in (by Sayali Marathe)

Image Credit- Freepik.com

(https://www.howtopronounce.com- pronunciation dictionary of German words)


Comments

One response to “ऑनलाइन जर्मन! जर्मन भाषेत हाय..हॅलो..सॉरी..थँक्यू!”

  1. Wow, good knowledge easy way. great work mam.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Verified by MonsterInsights