शीर्षकावरून तुम्हाला समजले असेल की मी या पोस्टमध्ये कोणत्या विषयाबद्दल बोलणार आहे! बरोबर – ‘वेळ’.
या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेत ‘वेळ’ कशी सांगायची हे जाणून घेऊया .
जर्मन भाषेत वेळेला म्हणतात ‘झाईट’ ! जर्मनमध्ये वेळ सांगण्याची एक विशिष्ट पद्धत आहे . पण सर्वप्रथम आपण सेकंद , मिनिट आणि तास यांना जर्मन भाषेत काय म्हणतात ते पाहूया. तर सेकंदला ‘जेकुंड’, मिनिटला ‘मिनुटं’ आणि तासाला ‘स्टुण्ड’ किंवा ‘ऊहर’ असे म्हणतात, मात्र ‘स्टुण्ड’ आणि ‘ऊहर’ या शब्दांचा प्रयोग वाक्यातील अर्थानुसार केला जातो. घड्याळालाही जर्मन मध्ये ‘ऊहर’ म्हणतात.
मागील एका पोस्ट मध्ये आपण संख्यांबद्दल जाणून घेतले आहे. त्याचाच संदर्भ घेऊन या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेतील ‘वेळ’ हा विषय बघूया.
तर एक मिनिट म्हणजे ‘आईनं मिनुटं’. ‘मिनुटं’ हा शब्द एकवचनी असून तो फक्त 1 हि संख्या सांगण्यासाठी उच्चारतात , तर दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक संख्या सांगण्यासाठी ‘मिनुटेन’ हा शब्द उच्चारतात . जसे ‘द्राय मिनुटेन’ ( 3 मिनिटे ) किंवा ‘झिबन मिनुटेन’ ( 7 मिनिटे ). हाच फरक ‘स्टुण्ड’ आणि ‘स्टुण्डेन’ मधला ! 1 तास सांगण्यासाठी ‘आईनं स्टुण्ड’, तर २ किंवा त्याच्यापेक्षा अधिक संख्या जसे 3 तास , 4 तास किंवा 5 तास सांगण्यासाठी अनुक्रमे ‘द्राय स्टुण्डेन’, ‘फिअर स्टुण्डेन’ आणि ‘फ्युन्फ स्टुण्डेन’ असे शब्दप्रयोग प्रचलित आहेत.
‘स्टुण्ड’ आणि ‘ऊहर’ (तास ) यांच्यामधील फरक असा कि, तासांची गणना करण्यासाठी ‘स्टुण्ड’ हा शब्द उपयोगात आणतात जसे “२ तास झालेत” किंवा “५ तास होऊन गेलेत”. अशा वेळेस वर सांगितल्याप्रमाणे ‘झ्वाय स्टुण्ड’ किंवा ‘फ्यून्फ स्टुण्ड’ हे शब्द प्रयोग प्रचलित आहे. तर आता ‘ऊहर’ (म्हणजे देखील तासच) हि संकल्पना जाणून घेण्यासाठी पुढील पोस्टला क्लिक करा.

© 2023 Fungerman.in (by Sayali Marathe)
Image Credit- Freepik.com
(https://www.howtopronounce.com- pronunciation dictionary of German words)

Leave a Reply