या पोस्टमध्ये आपण ‘ऊहर’ हि संकल्पना बघूया. ऊहर म्हणजेच वेळ सांगण्याची पद्धत. मराठी मध्ये जसे आपण “किती वाजले” असे विचारताच घड्याळात बघून आपण जी वेळ सांगतो तीच ‘ऊहर’!
जर्मन मध्ये 1 ते 24 अशा अंकांमध्ये वेळ सांगितली जाते. मध्यरात्री १ वाजल्यापासून ते दुसऱ्या मध्यरात्रीच्या 12 (म्हणजेच 24) वाजेपर्यंत वेळेची गणना केली जाते. मध्यरात्रीचे एक म्हणजेच ‘आईन ऊहर’ तर पहाटेचे 5 म्हणजेच ‘फ्युन्फ ऊहर’, सकाळचे 10 म्हणजेच ‘त्झीन ऊहर’ तर सकाळचे 12 म्हणजेच ‘झ्व्योल्फ ऊहर’.
दुपारच्या एक वाजल्यापासून मात्र वेळेची संबोधनं बदलतात . जसे दुपारचे एक ( म्हणजेच 13 वाजता ) म्हणजे ‘द्रायत्झीन ऊहर’ तर संध्यकाळचे सहा ( 18 वाजता ) म्हणजे ‘आख्टत्झीन ऊहर’. रात्रीचे 10 ( 22 वाजता ) म्हणजे ‘झ्वाय उण्ड झ्वान्झिश ऊहर’ तर रात्रीचे 12 ( 24 वाजता) म्हणजे ‘फिअर उण्ड झ्वान्झिश ऊहर’ होय.
‘अर्धा तास’ म्हणजेच जर्मन भाषेमध्ये ‘हाल्ब’ . ‘साडे तीन’ हे जर्मन मध्ये ‘हाल्ब फिअर’ ( चारचा अर्धा म्हणजेच साडे तीन) असे सांगतात . याचप्रमाणे ‘हाल्ब फ्युन्फ’ म्हणजेच साडे चार, तर साडे सात साठी ‘हाल्ब आख्ट’! मात्र दुपारच्या दीड वाजण्याला ‘द्रायत्झीन ऊहर द्रायझीश’ (13. 30) तर रात्रीच्या साडे अकराला ‘द्राय उण्ड झ्वान्झिश ऊहर द्रायझीश’ (23. 30) असे संबोधतात
‘पाऊण’ ही संकल्पना सांगण्यासाठी ‘फिअरटेल’ शब्द बोलला जातो . पाऊणे सात म्हणजेच ‘फिअरटेल फोर झिबन’ तर सव्वा नऊ साठी ‘फिअरटेल नाख नॉइन’ बोलले जाते. ‘फोर’ म्हणजेच 15 मिनिटे अगोदर तर ‘नाख’ म्हणजे १५ मिनिटे नंतर.
अशा तर्हेने जर्मन भाषेमधील वेळेची गणना समजून घेतल्यावर तुम्हीही तुमच्याकडे आत्ता किती वाजले आहेत ते सांगा बरं

© 2023 Fungerman.in (by Sayali Marathe)
Image Credit- Freepik.com
(https://www.howtopronounce.com- pronunciation dictionary of German words)

Leave a Reply