या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमधील रंगांची नावे जाणून घेऊया. रंग म्हणजे जर्मन भाषेत ‘फार्बेन’! रंग कोणाला आवडत नाही? रंगांचे अस्तित्वच नसते तर सर्व काही भकास वाटले असते. त्यामुळे रंगांचा संबंध माणसाच्या मानसिक स्थितीशी जोडला जाऊ शकतो. वेगवेगळ्या आकर्षक रंगसंगतीमुळे मनाला सुखकारक वाटते. रंग हे ‘मूडचेंजर’ असतात असेही म्हणता येईल!
हिरवा,लाल, गुलाबी, नारंगी, पिवळा, निळा, जांभळा, काळा, पांढरा अशा विविध रंगांची जर्मन भाषेमध्ये विविध नावं आहेत.
जसे लाल रंगाला ‘रॉट’ तर गुलाबी रंगाला ‘रोजा’ संबोधतात. ‘ऑरांज’ म्हणजे नारंगी (इंग्लिश मध्ये ‘ऑरेंज’ तर जर्मन मध्ये ‘ऑरांज’) तर ‘गेल्ब’ म्हणजे पिवळा, निळ्याला ‘ब्लाऊ’ तर जांभळ्याला ‘लीला’ म्हणतात. ‘श्वार्झ’ म्हणजे काळा तर ‘वाईज’ म्हणजे पांढरा. हिरवा रंग ‘ग्र्युन’, तपकिरीला ‘ब्राऊन’ तर राखाडीला ‘ग्राऊ’.
फिक्कट म्हणजे ‘हेल’ जसे फिक्कट निळा म्हणजे ‘हेलब्लाऊ’ तर गडद म्हणजे ‘डुंकेल’ जसे गडद निळा म्हणजे ‘डुंकेलब्लाऊ’. रंगीबेरंगी म्हणजे ‘बुंट’. माझा आवडता रंग ‘क्योनिग्ज ब्लाऊ’ म्हणजेच रॉयल ब्ल्यू आणि ‘रोजा’ म्हणजेच गुलाबी. तुमचा आवडता रंग मला जर्मन मध्ये सांगाल का?

© 2023 Fungerman.in (by Sayali Marathe)
Image Credit- Freepik.com
(https://www.howtopronounce.com- pronunciation dictionary of German words)

Leave a Reply