या पोस्टमध्ये आपण जर्मन भाषेतील दिवसांची आणि महिन्यांची नावे बघूया. जसं आपण मराठीमध्ये दिवसाला ‘वार’ असे म्हणतो तसंच जर्मन भाषेमध्ये दिवसाला ‘टाग’ तर महिन्याला ‘मोनाट’ असे संबोधले जाते. मराठी मध्ये जसे सोमवार, मंगळवार, बुधवार अशी दिवसांची तर जानेवारी , फेब्रुवारी , मार्च , जून अशी महिन्यांची नावं आहेत तशी जर्मन भाषेमध्येही दिवसांची आणि महिन्यांची वेगवेगळी नावं आहेत.
आता आपण ‘टाग’ म्हणजेच जर्मनमधील दिवसांची नावं बघूया. जर्मन भाषेत सोमवारला ‘मोंटाग’ तर मंगळवारला ‘डिन्स्टाग ‘ असे संबोधले जाते. बुधवारला ‘मिट्टवोख ‘ (‘मिट्ट ‘ म्हणजे मध्य आणि ‘वोख’ म्हणजे आठवडा म्हणजेच आठवड्याच्या मध्यावर येणार दिवस बुधवार) तर गुरुवारसाठी ‘डॉनर्स्टाग ‘असे नाव प्रचलित आहे. शुक्रवारसाठी ‘फ्रायटाग ‘ तर शनिवार आणि रविवार यांच्यासाठी अनुक्रमे ‘साम्स्टाग ‘आणि ‘जोन्टाग ‘अशी नावं प्रचलित आहेत.
दिवसांची नावं जाणून घेतल्यानंतर आता आपला मोर्चा महिन्यांच्या नावांकडे वळवूया . तर ‘मोनाट’ म्हणजेच महिन्यांची नावं ही अशी – जानेवारीला जर्मन भाषेमध्ये ‘यानुआर’ तर फेब्रुवारीला ‘फेब्रुआर’ असे म्हणतात. मार्चला ‘मेर्झ’ तर एप्रिलला ‘आप्रील’ असे संबोधतात. जून आणि जुलै यांचे उच्चार अनुक्रमे ‘युनी’ आणि ‘युली’ असे आहेत कारण जर्मन भाषेमध्ये इंग्लिशमधील ‘J’ म्हणजेच ‘ज’ चा उच्चार ‘य’ असा केला जातो त्यामुळेच जानेवारीला ‘यानुआर’ तर जून आणि जुलै हे म्हणजे ‘युनी’ आणि ‘युली’ असे उच्चारले जातात.
ऑगस्ट साठी ‘आउगस्ट’ तर सप्टेंबर साठी ‘त्झेप्टेंबर ‘ अशी शब्दयोजना आहे. इथेही एक महत्वाचे असे कि, इंग्लिश मधील S चा उच्चर जर्मन मध्ये ‘त्झ’ असा केला जातो. प्रमाणे होतो, त्यामुळेच इंग्रजी सप्टेंबरला जर्मन मध्ये ‘त्झेप्टेंबर ‘ असे संबोधले जाते.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे इंग्लिश उच्चार जर्मन भाषेतही सारखेच आहेत- ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच!
डिसेंबरला मात्र ‘डित्जेंबर’ असे संबोधतात.
अशा तऱ्हेने आपण या पोस्टमध्ये वारांची आणि महिन्यांची नावे बघितली. पुढच्या पोस्टमधली माहिती उलगडण्यासाठी पुढील नव्या पोस्टवर क्लिक करा.

© 2023 Fungerman.in (by Sayali Marathe)
Image Credit- Freepik.com
(https://www.howtopronounce.com- pronunciation dictionary of German words)

Leave a Reply