ऑर्डिनल्स म्हणजेच क्रमवाचक शब्द. मराठी मधील प्रथम, द्वितीय , तृतीय किंवा इंग्लिश मधील फर्स्ट , सेकण्ड, थर्ड या शब्दांसारखेच जर्मन भाषेमध्ये वेगवेगळे क्रमवाचक शब्द आहेत. तारखा तसेच वस्तूची स्थिती सांगण्यासाठी या क्रमवाचक शब्दांचा म्हणजेच ऑर्डिनल्सचा उपयोग केला जातो.
मराठी मधील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, यांना जर्मन भाषेमध्ये अनुक्रमे ‘एर्स्टेन/एर्स्ट’,(एर्स्ट-अ, अशा प्रकारे सगळे ‘ट’ दीर्घ लांबवणे ), ‘झ्वाइटेन/झ्वाइट’, ‘ड्रिट्टेन/ड्रिट्ट’, ‘फिअर्टेन/फिअर्ट’,’फ्युन्फटेन/फ्युन्फट’ तर सहावा, सातवा, आठवा,नववा, दहावा यांना अनुक्रमे ‘झेखस्टेन/झेखस्ट’, ‘झीब्स्टेन/झीब्स्ट’, ‘आख्टेन/आख्ट’, ‘नॉईन्टेन /नॉईन्ट’ आणि ‘झिंटेन/झिंट’ म्हणतात.
याच प्रकारे अकरावा, बारावा, तेरावा, चौदावा , पंधरावा यांना अनुक्रमे ‘एल्फ्टेन/एल्फ्ट’ , ‘झ्व्योल्फ्टेन/झ्व्योल्फ्ट’, ‘द्रायझिन्टेन/द्रायझिन्ट’, ‘फिअरझिन्टेन/फिअरझिन्ट’, ‘फ्युन्फझिन्टेन/फ्युन्फझिन्ट’ तर सोळावा, सतरावा, अठरावा, एकोणिसावा आणि विसावा यांना ‘झेश्झिंटेन/झेश्झिंट’, ‘झीब्झिंटेन/झीब्झिंट’, ‘आख्टझिंटेन/आख्टझिंट’, ‘नॉइन्झिंटेन/नॉइन्झिंट’ आणि ‘झ्वान्झिग्स्टेन/झ्वान्झिग्स्ट’ म्हणतात.
हे क्रमवाचक शब्द वापरून वाढदिवसाची तारीख सांगायची तर २१ ते ३१ यांचीही क्रमवाचक नावे बघायला हवीत ना!
तर एकवीस , बावीस आणि तेवीससाठी अनुक्रमे ‘आईन उंड झ्वान्झिग्स्टेन’, ‘झ्वाय उंड झ्वान्झिग्स्टेन’, ‘द्राय उंड झ्वान्झिग्स्टेन’ हे क्रमवाचक शब्द प्रचलित आहेत. चोवीस, पंचवीस आणि सव्वीस साठी ‘फिअर उंड झ्वान्झिग्स्टेन’, ‘फ्यूनफ उंड झ्वान्झिग्स्टेन’ आणि ‘झेख्स उंड झ्वान्झिग्स्टेन ‘हे शब्द, तर सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस , तीस आणि एकतीस साठी अनुक्रमे ‘झिबन उंड झ्वान्झिग्स्टेन’, ‘आख्ट उंड झ्वान्झिग्स्टेन ‘,’नॉईन उंड झ्वान्झिग्स्टेन’ आणि ‘द्रायजीश’ हि क्रमवाचक शब्द प्रचलित आहे.
आता वाढदिवसाचे पाहू! २७ एप्रिल हा जन्मदिवस जर्मन भाषेमध्ये मध्ये ‘झिबन उंड झ्वान्झिग्स्टेन –आप्रील’ असा , तर १५ जुलै ‘फ्युन्फझिन्टेन- युली’ असा सांगितलं जातो. ४ मे हा ‘फिअरटेन -माई’ तर ११ ऑगस्ट हा ‘एल्फटेन -आऊगुस्ट’ असा उच्चरतात.
तर आता तुम्ही सुद्धा तूमचा जन्मदिनांक आणि जन्ममहिना वर दिलेल्या माहितीमधील तारखा आणि महिने यांची व्यवस्थित सांगड घालून सांगून बघा! तुम्हाला नक्की जमणार!

© 2023 Fungerman.in ( by Sayali Marathe)
Image Credit- Freepik.com
(https://www.howtopronounce.com- pronunciation dictionary of German words)

Leave a Reply